मंगळुरू येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने लावलेल्या फलकांवर पं. नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छायाचित्रे

  • फलकावर ‘राजकारणाचा आधार हिंदुत्व असावा, सर्व हिंदूंना सैनिक करा’ असे लिखाण

  • विरोधी पक्षांच्या विरोधानंतर पोलिसांनी फलक हटवले !

प्रतीकात्मक छायाचित्र

मंगळुरू (कर्नाटक) – येथे हिंदु महासभेकडून श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या फलकांवर पंडित नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्रांसह ‘राजकारणाचा आधार हिंदुत्व बनवून सर्वच हिंदूंना सैनिक बनवा’ असे लिहिण्यात आले होते.

त्याला विविध राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर हे फलक पोलिसांनी काढले. या फलकांविषयी चौकशी करण्याचाही आदेशही पोलिसांना देण्यात आला आहे. हे फलक हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजेश प्रवथन यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत लावले होते.