‘पाकिस्तान झिंदाबाद’चे स्टेट्स ठेवणार्‍या धर्मांध शिक्षकावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे स्टेट्स ठेवणारे शिक्षक जावेद अहमद याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्याला पोलिसांनी कह्यात घेतला आहे. हा शिक्षक अतिग्रे येथील ‘घोडावत इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर घोडावत स्कूल प्रशासनाने त्याची तात्काळ हकालपट्टी केली आहे. (भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणार्‍यांना भारतातून हाकलून द्या, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)

जावेद अहमद हा इंग्रजीचा शिक्षक आहे. १४ ऑगस्टच्या रात्री त्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे स्टेट्स  भ्रमणभाषवर लावले. पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने अहमदला कह्यात घेतले. विद्यार्थी आणि पालक यांनी या संदर्भात प्राचार्य आणि संस्थाचालकांकडेही तक्रार दिली. तक्रारीची नोंद घेत शाळा प्रशासनाने त्याची हकालपट्टी केली. असे वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

संपादकीय भूमिका

उद्दाम धर्मांधांची मानसिकता लक्षात येते. त्यांना कुणाचे भय नाही, हे चिंताजनक आहे, असे धर्मांध देशाला घातक आहेत. अशांना कठोर शिक्षा व्हायला हवी !