दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये गेल्या ९ मासांत बनावट दारू प्राशन केल्यामुळे ६० जणांचा मृत्यू !

सारण (बिहार) – बनावट दारू पिल्याने बिहारच्या सारण जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्याच आठवड्यात यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण आजारी पडले होते. बनावट दारू विकणार्‍यांचा शोध घेण्यात येत आहे. एप्रिल २०१६ पासून बिहार राज्यात दारूची विक्री आणि पिणे यांवर बंदी आणण्यात आली आहे; परंतु गेल्या नोव्हेंबर मासापासून दारू पिल्याने ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

संपादकीय भूमिका

यातून केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्यांची प्रभावी कार्यवाही होणे अपेक्षित आहे, हे स्पष्ट होते. राजसत्ता आणि समाजमन या दोघांचे अध्यात्मीकरण करणे हेसुद्धा किती आवश्यक आहे, हेही यातून लक्षात येते !