गोवा : महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विराग पवार निलंबित

(प्रतिकात्मक चित्र)

मडगाव, २८ जुलै (वार्ता.) – महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असल्याने मडगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विराग पवार याला निलंबित करण्याचा आदेश दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी बुधवार, २७ जुलै २०२२ या दिवशी दिला आहे. मडगाव येथील एका महिलेने उपनिरीक्षक पवार याच्या विरोधात तक्रार दिली असून या उपनिरीक्षकाने तिला कोल्हापूर येथे नेऊन लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप केला आहे. याविषयी पुरावे म्हणून तिने काही आक्षेपार्ह चित्रफिती जोडल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मडगाव पोलिसांनी ही तक्रार नोंद करून घेतली असून पुढील कारवाईसाठी कोल्हापूर पोलिसांकडे पाठवली आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक धनिया यांच्याशी संपर्क साधला असता या उपनिरीक्षकाला निलंबित केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

संपादकीय भूमिका

जनतेचे रक्षक नव्हे भक्षक पोलीस !