कावड यात्रेकरूंची सेवा करणार्‍या मुसलमान तरुणाला अज्ञातांकडून मारहाण

कावड यात्रा ( प्रतिकात्मक छायाचित्र )

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथे कावड यात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूंची सेवा केल्यावरून काझी फरहान या तरुणाला अज्ञातांनी मारहाण करत त्यांच्यावर धारदार शस्त्राद्वारे वार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याविषयी फरहान म्हणाला, ‘‘मी शांकभरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले होते आणि कावड यात्रेकरूंची सेवा केली होती. यामुळेच माझ्यावर आक्रमण झाले.’’

संपादकीय भूमिका

हिंदूंना निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव यांचे डोस पाजणारे याविषयी तोंड का उघडत नाहीत ?