शिवसैनिकांच्या जिवाशी येत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसैनिकांच्या जिवाशी येत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथे दिली आहे. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी आक्रमण केले होते. पोलिसांनी त्यांची तक्रारही प्रविष्ट करून घेतली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथे जाऊन त्या शिवसैनिकांची विचारपूस केली. त्या वेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे पोलिसांना म्हणाले, ‘‘शिवसैनिकांचे रक्त न सांडण्याचे मी आवाहन करत आहे; मात्र तरीही तसे होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे. असे राजकारण कधीच झाले नव्हते. तुम्ही राजकारणात पडू नका.’’