पुण्यातील सर्वच पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश !

पुणे – हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडदुर्ग, धरण, तलाव, धबधबे आदी पर्यटनस्थळांच्या परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

पर्यटनस्थळाच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्य बाळगणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, कचरा, तसेच प्लास्टिकच्या बाटल्या इतरत्र फेकणे, ध्वनीप्रदूषण करणे अशा कृती करण्यास अटकाव केला आहे. या परिसरातील १ कि.मी. परिघामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.