दादर रेल्वेस्थानकातील प्रकार !
मुंबई – कल्याण-सी.एस्.टी. वातानुकूलित लोकल १२ जुलै या दिवशी पहाटे दादर रेल्वेस्थानकात आली; पण तिचे दरवाजे उघडलेच गेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. ‘आता पुढच्या स्थानकात उतरावे लागेल. पुढच्या स्थानकातही दरवाजा उघडणार कि नाही’, अशी चर्चा प्रवाशांमध्ये चालू होती. रेल्वे बराच वेळ दादर स्थानकात थांबली होती. शेवटी मोटरमनने दरवाजे उघडले.