२ आतंकवाद्यांना अटक
नवी देहली – अमरनाथ यात्रेवरील आतंकवादी आक्रमणाचा कट पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी ‘लष्कर-ए-तोयबा’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. फैजल अहमद डार आणि तालिब हुसेन अशी अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत.
Terror Strike on Amarnath Yatra Averted: Villagers Help Cops Catch 2 Terrorists, Guv Announces Rs 5 Lakh Reward | @TejinderSsodhi
Read here: https://t.co/040aTPWShU pic.twitter.com/Dl456eEUak
— News18.com (@news18dotcom) July 3, 2022
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून या दिवशी यात्रेकरूंची पहिली तुकडी अमरनाथकडे मार्गस्थ झाली. यात्रेवर आक्रमण करण्याचा या आतंकवाद्यांचा डाव होत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हे आक्रमण करण्यात येणार होते. तालिब हुसेन हा या आक्रमणाचा सूत्रधार होता. त्याने फैजल याच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर हे दोघे तुकसान जिल्ह्यातील गावात लपून बसले होते. त्यांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने त्यांना अटक केली. तालिब हुसेन याने यापूर्वी राजौरीमध्ये दोन बॉम्बस्फोटांची चाचणी केली होती.
आतंकवाद्यांना पकडून देणार्यांना बक्षिस घोषित !
या आतंकवाद्यांना पकडून देणार्यांना ग्रामीण पोलिसांनी २ लाख रुपये, तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ५ लाख रुपयांचे बक्षिस घोषित केले आहे.
संपादकीय भूमिका
|