(म्हणे) ‘आपला देश हिंदु राष्ट्र नाही !’

बिहारच्या विधानसभेत ‘वन्दे मातरम्’च्या वेळी आमदार सऊद आलम यांचा उभे रहाण्यास नकार !

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता ३० जून या ‘वन्दे मातरम्’ने झाली. ‘वन्दे मातरम्’ चालू असतांना राज्याच्या ठाकूरगंज येथील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सऊद आलम हे त्यांच्या जागेवर बसून होते. ते उभे राहिले नाहीत. या वेळी भाजपच्या आमदारांनी त्यांना उभे रहाण्यास सांगितले; मात्र आलम यांनी ऐकले नाही. ‘वन्दे मातरम्’ संपल्यानंतर आलम सभागृहाच्या बाहेर आल्यावर पत्रकारांनी त्यांना ‘वन्दे मातरम्’च्या वेळी उभे का राहिला नाहीत ?’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर आलम म्हणाले की, आपला देश हिंदु राष्ट्र नाही. मी केवळ ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या वेळीच उभा राहू शकतो. ‘वन्दे मातरम्’च्या वेळी उभे रहाण्यासाठी माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही.

संपादकीय भूमिका 

भारतातील बहुसंख्य मुसलमानांचा ‘वन्दे मातरम्’ला विरोध आहे, हे जगजाहीर आहे. त्यातूनच सऊद आलम यांनी उभे रहाण्यास नकार दिला, हे लक्षात येते. अशांनी आता त्यांच्या धर्माच्या ५७ देशांत निघून जावे, असे कुणी सांगितले, तर आश्‍चर्य ते काय ?