पुरुषांशी शारीरिक संबंध न ठेवण्याचे महिलांचे आंदोलन !

अमेरिकेत गर्भपातावरील बंदीला वाढता विरोध !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात करणे अवैध ठरवल्यानंतर नागरिकांकडून त्यास प्रचंड विरोध होत आहे. आता अमेरिकेतील महिलांनी या निर्णयाची शिक्षा म्हणून पुरुषांशी शारीरिक संबंध न ठेवण्याचे आंदोलन चालू केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ज्यांनी नसबंदी केली आहे किंवा केलेली नाही, तसेच गर्भनिरोधकाचा वापर करणार असोत किंवा नसतो, तरीही त्या संबंध ठेवणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक माध्यमांतून या आंदोलनाचा प्रसार केला जात आहे. हे आंदोलन काही ठिकाणी हिंसकही झाले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

१. या महिलांचे म्हणणे आहे की, नव्या कायद्यामुळे आता आम्ही गर्भवती होण्याचा धोका पत्कारू शकत नाही; म्हणूनच आम्ही शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध करत आहोत. जगभरातील महिलांनीच शारीरिक संबंध ठेवणे बंद केले पाहिजे. आमच्यावरील बलात्कार रोखण्यासाठी आतापर्यंत उपाय का काढण्यात आले नाही ?

२. काही महिलांचे म्हणणे आहे की, आता गर्भपात करण्यासाठी अन्य देशांत जावे लागेल, त्यासाठी वेळ आणि पैसाही लागेल.