महाराष्‍ट्रातील महत्त्वाच्‍या विभागांंमधील लाचखोरीची प्रकरणे !

महाराष्‍ट्रात पोलीस विभागाच्‍या खालोखाल महसूल विभाग लाचखोरीत वरच्‍या स्‍थानी आहे. मागील १२ वर्षांत महसूल विभागामध्‍ये एकूण २ सहस्र ९९८ जण लाच घेतांना पकडले गेले. या आकडेवारीनुसार महसूल विभागातही प्रत्‍येक मासाला लाचखोरीची २० प्रकरणे घडत आहेत. ग्रामीण भागांशी जोडलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील सरकारी नोकरही लाच घेण्‍यात अग्रणी आहेत. पंचायत समित्‍यांमध्‍ये प्रतिवर्षी ९५, महानगरपालिकांमध्‍ये ६२, तर जिल्‍हा परिषदांमध्‍ये प्रतिवर्षी ४२ लाचखोरीची प्रकरणे उघड होत आहेत. महावितरणमध्‍ये प्रतिवर्षी ६२, आरोग्‍य २९, वन २६, तर शिक्षण विभागात प्रतिवर्षी ३८ लाचखोरीच्‍या प्रकरणांची सरासरी आहे.