तमिळनाडूमध्ये पाद्य्राने मुसलमानांना दुसरी फाळणी करण्यासाठी चिथावले !

  • पाद्री सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या खासदाराचा निकटवर्तीय !

  • अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना मुसलमानांची साथ देण्याचे आवाहन !

पाद्री जेगथ जसपर राज

चेन्नई – सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या खासदार कन्निमोळ्ळी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पाद्री जेगथ जसपर राज यांनी ‘मुसलमानांनी दुसर्‍या फाळणीसाठी प्रयत्न करावेत’, असे चिथावणीखोर वक्तव्य केले. ‘अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांनीही मुसलमानांच्या या मागणीला समर्थन देण्यासाठी पुढे यावे. संयुक्त राष्ट्रांनी भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ‘आतंकवादी संघटना’ घोषित करावे, यासाठी भारतातील मुसलमानांनी इस्लामी देशांचे साहाय्य घ्यावे’, असेही पाद्री राज याने म्हटले आहे. (पाद्री आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांचे ध्येय हे केवळ हिंदूंचे धर्मांतर करणे, एवढ्यापुरते सीमित नसून त्यांना भारताचे तुकडे करायचे आहे, हे लक्षात घ्या ! सरकारने अशांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक)

१. उत्तरप्रदेश सरकारने अवैध बांधकामे पाडण्याच्या हाती घेतलेल्या मोहिमेचा निषेध करण्यासाठी येथील ‘सोशल अ‍ॅक्टिविस्ट फोरम्’ या स्वयंसेवी संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी पाद्री राज याने ही चिथावणीखोर वक्तव्ये केली.

२. ‘भारतात मुसलमान, तसेच अनुसूचित जाती आणि जमाती यांची लोकसंख्या ४२ टक्के आहे. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन स्वतंत्र देशाची मागणी करायला हवी. अशी मागणी करण्यात चुकीचे असे काहीच नाही. भारतातील केवळ मुसलमानांनी ‘देशातील २० टक्के भूभाग आम्हाला द्यावा’, अशी मागणी केली, तर तामिळनाडू, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये मिळून जेवढा भूभाग निर्माण होईल, तेवढ्या आकाराचा भूभाग त्यांना सहज मिळेल’, असेही वक्तव्य त्यांनी केले.

३. सध्या तमिळनाडूतील ख्रिस्ती मिशनरी हे हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी मुसलमानांना चिथावत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील एजरा सरगुणम् नावाच्या एका ख्रिस्ती पाद्य्राने काही दिवसांपूर्वी ‘तुम्ही (मुसलमान) गप्प का आहात ? त्यांनी (हिंदूंनी) तुम्हाला हात लावला आहे. तुम्ही त्यांची (हिंदूंची) ‘काळजी’ घ्यायला हवी’, असे वक्तव्य केले होते.

संपादकीय भूमिका

  • तमिळनाडूमध्ये ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’चे (द्रविड प्रगती संघाचे) सरकार राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी पाद्य्रांना राजाश्रय देत असल्यामुळे त्यांचे फावले आहे. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच तमिळनाडूतील अशा राष्ट्रघातकी घटकांवर कारवाई करावी !
  • तमिळनाडू राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी कारवायांचा अड्डा बनला आहे. या कारवाया रोखण्यासाठी केंद्र सरकारने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !