म्हैशाळ (जिल्हा सांगली) सामूहिक आत्महत्या प्रकरणात १३ खासगी सावकारांना अटक !

सांगली, २ २   जून (वार्ता.) – म्हैशाळ येथे २० जून या दिवशी एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एकूण २५ खासगी सावकरांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांपैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकारांना दिली.

आत्महत्या करण्यापूर्वी या कुटुंबाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या सर्वांनी कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अन्वेषण करत २५ जणांवर गुन्हा नोंद करत १३ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.