‘आमचा पुण्यपावन भारत आज जीवन, यश, धर्म आणि विजय यांपासून भ्रष्ट कसा झाला ? या पवित्र भारतभूमीत सनातन हिंदु परंपरेत देवदुर्लभ असा जन्म घेऊन जन्माचे सार्थक करण्याचे सोडून इहवादी पाश्चात्त्य प्रणालीच्या भोगजीवनाला आसुसलेली आमची उगवती पिढी रोगाची लागण झालेल्या कोंबड्यासारखी पटापट का मरत आहे ? केस राखणे, चित्रपट पहाणे, अपेयपान करणे, मित्र-मैत्रिणी, व्हॅलेन्टाईन डे यांसारखी थोतांडे नाचवणे तुम्हाला भूषणास्पद वाटावे ? थोडासा भोगजीवनाला धक्का लागताच, प्रेमभंग होताच, ढेकणाचे औषध पिऊन व्यर्थ का मरता ? पराक्रमाची शर्थ करणारा पूर्वजांचा लक्षावधी वर्षांचा वारसा पाठीशी असूनही धर्मविराचे मरण पत्करायला का तयार होत नाही ?
मोठा चमत्कार आहे ! या दळभद्री निधर्मीवाद्यांनी हिंदमातेच्या सुपुत्रांना शेळीचे दूध पाजून पूर्ण षंढ करून ठेवले आहे. नेहरूप्रणित निधर्मी (म्हणजे देशद्रोही) राज्यकर्त्यांच्या नामर्द आणि षंढ शासनामुळे आमची उगवती पिढी भेंड्यांच्या भाजीसारखी बुळबुळीत जगायला शिकली आहे. चेतवलेली हिंदु मनेही या निधर्मीवाद्यांनी षंढ बनवली आहेत. या देशाला ठिणग्यांची गरज आहे. या ठिणग्या आमच्या तरुणांना पेटवतील का ? त्यांची अस्मिता उजळून टाकतील का ? बुलेटमधून अंगार पेटावा, तसा सनातन हिंदु धर्म आमच्या नसानसांतून या ठिणग्या उडवील का ? तुमची नजर जहाल बनून त्यातून या ठिणग्या बाहेर पडतील का ?’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साभार साप्ताहिक सनातन चिंतन, १७ मे २००७, अंक १६)
व्यष्टी आणि समष्टी साधना करणाऱ्या अशा तरुण-तरुणींची आज आवश्यकता !
व्यष्टी साधना
- ‘ज्यांच्या श्रद्धेची आणि समर्पणाची कमाई डोळ्यांत भरते !
- ज्यांची संवेदनक्षमता, सजगता, सावधानता आणि साक्षित्व रोमारोमातून उफाळून बाहेर पडत आहेत !
- ज्यांचे नेम-अभ्यास, आहार, विहार, विश्राम आणि व्यायाम हे जीवन व्यापून राहिले आहेत !
- ज्यांची शरीरे-मने आरोग्याने, नित्यनूतन, टवटवीत, ताजगीने रसरसलेली आहेत !
- वासना भडकावणारे चित्र-चारित्र्य, मोडून-तोडून टाकणारी नास्तिकता, जडवाद पोसणारे, पशू बनवणारे असे जे काही आहे (वाङ्मय, चित्रकला, वास्तू, चित्रपट, टी.व्ही.) त्यांकडे ढुंकूनही न पहाणारे आहेत !
समष्टी साधना
- ज्यांची धारणा आहे, ‘स्वतःसाठी आपला जन्म, जीवन नाहीच !
- जे आहे ते धर्माकरता, राष्ट्राकरता, विश्वकल्याणाकरता !’
- ज्यांना निर्भयता-निरहंकारतेची ओढ आहे. धर्मासाठी जे दारिद्र्यही पत्करतील.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार मासिक ‘घनगर्जित’, वर्ष दुसरे, अंक १)