पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवा साधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण !

शाळेत अव्वल : संस्कृत आणि गणित या विषयांत १०० पैकी १०० गुण !

कु. आर्या श्रीश्रीमाळ

पुणे – येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवा साधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळाले आहेत. पुण्यातील ‘अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स’ या शाळेत तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कु. आर्या हिचे वडील श्री. महावीर श्रीश्रीमाळ हे पूर्णवेळ धर्मप्रसाराचे कार्य करतात. कु. आर्या हिची आई सौ. मानसी श्रीश्रीमाळ यांचे तिला अभ्यासात सतत मार्गदर्शन लाभले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच प्रयत्न करून घेतले ! – कु. आर्या श्रीश्रीमाळ

या यशाविषयी बोलतांना कु. आर्या म्हणाली, ‘‘मी परीक्षेच्या आधी आणि नंतर परमपूज्य गुरुदेवांना (सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) मानस नमस्कार करायचे. ‘परमपूज्य, तुम्हीच माझ्याकडून अभ्यास करवून घ्या आणि प्रश्‍नपत्रिका शांतपणे सोडवता येऊ दे’, अशी प्रार्थना करत होते. अभ्यासाच्या आधी नामजपही करायचे. परीक्षेच्या काळात सनातन संस्थेचे ‘ऑनलाईन’ भावसत्संगही ऐकले होते. हे यश परमपूज्य गुरुदेवांमुळेच मिळाले आहे. त्यांनीच प्रयत्न करवून घेतले आणि त्यांनीच आशीर्वाद दिला.’’