नागौर (राजस्थान) येथे विवाहित हिंदु तरुणीला ४० वर्षीय मुसलमानाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले !

नागौर (राजस्थान) – येथील रियांबडी गावामध्ये ४० वर्षांच्या अलाउद्दीन कुरैशी या मुसलमान व्यक्तीने १९ वर्षीय विवाहित हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. ‘ही लव्ह जिहादची घटना असून आरोपीला तात्काळ अटक केली नाही, तर येथील वातावरण बिघडू शकते’, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी प्रशासनाला दिली आहे. याविषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी काही पथक बनवले आहेत.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्ये लव्ह जिहाद रोखण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा करून त्यावर आळा बसण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र राजस्थानमध्ये अशा घटना वारंवार घडत असूनही काँग्रेस सरकार त्या रोखण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही, हे संतापजनक !