कोल्हापूर, ४ जून (वार्ता.) – मोदी सरकारने गेल्या ८ वर्षांत जनतेने दाखवलेल्या विश्वासाला समर्पक कामगिरी करत गरीब आणि युवक यांना केंद्रबिंदू मानून विशेष कामगिरी केली. ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’द्वारे ८० कोटी लोकांना विनामूल्य अन्नधान्य यांचा पुरवठा, ‘आयुष्यमान भारत योजने’च्या अंतर्गत ३.२ कोटी लोकांना विनामूल्य वैद्यकीय उपचार, ‘हर घर नल से जल’ योजनेच्या अंतर्गत ६.२ कोटी घरांत नळजोडणी, ८ वर्षांत १५ नवीन आयुर्विज्ञान संस्था, २०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये, खतांसाठी १ सहस्र २०० रुपयांचे अनुदान, तसेच देशभरातील सरकारी सेवांसाठी ४.४६ लाख सेवाकेंद्रे चालू केली. अशा प्रकारे मोदी सरकारने गेल्या ८ वर्षांत भ्रष्टाचार विरहित सुशासन दिले, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजपचे राहुल चिकोडे, नाथाजी पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
सुरेश हाळवणकर पुढे म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांत आतंकवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे असे दिसत असले, तरी येणाऱ्या काळात तिथे ‘शून्य’ आतंकवादी दिसतील. हिंदु पंडितांना वसवण्यासाठी तेथे भाजप शासन स्वतंत्र वसाहती उभ्या करत असून येणाऱ्या काही काळात तुम्हाला परिस्थिती पालटलेली दिसेल.’’