श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्यामुळे त्यांनी दैवी प्रवासासाठी उपयोगात आणलेल्या वाहनांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

 

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सप्तर्षींच्या मार्गदर्शनानुसार भारतभरातील विविध तीर्थक्षेत्री जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेतात. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू देवतांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भावपूर्ण प्रार्थना करतात. हा दैवी प्रवास ज्या वाहनांतून करण्यात आला त्यातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी उपयोगात आणलेल्या वाहनांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी वाहनांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणे आणि त्यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दैवी दौर्‍यासाठी वापरलेले पहिले वाहन
सध्या दैवी दौर्‍यासाठी वापरलेले दुसरे वाहन

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दैवी प्रवासासाठी उपयोगात आणलेल्या वाहनांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

एप्रिल २०१६ ते मार्च २०२० पर्यंत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी दैवी प्रवासासाठी पहिले नवीन वाहन उपयोगात आणले. त्यानंतर जून २०२० पासून आतापर्यंत त्यांनी तशाच प्रकारचे दुसरे नवीन वाहन उपयोगात आणले. या दोन्ही वाहनांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाने चाचण्या करण्यात आल्या. तसेच तुलनेसाठी म्हणून तशाच प्रकारच्या सर्वसाधारण वाहनाची चाचणी करण्यात आली. या चाचण्यांतील निरीक्षणे पुढे दिली आहेत.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. तुलनेसाठीच्या सर्वसाधारण वाहनामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.(हायपर लिंक देणे)

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दैवी प्रवासासाठी उपयोगात आणलेल्या वाहनांमध्ये अल्प कालावधीत पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी दैवी प्रवासासाठी उपयोगात आणलेल्या दोन्ही वाहनांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी प्रवासासाठी उपयोगात आणलेल्या वाहनाची सप्टेंबर २०१८ मध्ये पहिल्यांदा जेव्हा चाचणी केली, तेव्हा त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि तिची प्रभावळ ७.७० मीटर होती. त्यानंतर केवळ १२ दिवसांनी त्या वाहनाची पुन्हा चाचणी केली, तेव्हा त्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १९.१२ मीटर आली, म्हणजे आधीच्या तुलनेत प्रभावळीत दुपटीहून अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर साधारण ५ मासांनी त्या वाहनाची पुन्हा चाचणी केली, तेव्हा त्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २१५.३२ मीटर आली, म्हणजे आधीच्या तुलनेत तिच्यात १० पटींनी वाढ झाली. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.

मार्च २०२० मध्ये तशाच प्रकारचे नवीन वाहन खरेदी करण्यात आले. गत २ वर्षांपासून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू या दुसर्‍या वाहनाने दैवी प्रवास करत आहेत. २६.५.२०२२ या दिवशी या दुसर्‍या वाहनाची चाचणी करण्यात आली, तेव्हा तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि तिची प्रभावळ ११५१.६५ मीटर आली. हे पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आहे.

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील चैतन्यामुळे त्यांनी उपयोगात आणलेली दोन्ही वाहने चैतन्याने भारित होणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू उच्च आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संत आहेत. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री महालक्ष्मीस्वरूप असल्याचे सप्तर्षींनी सांगितले आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्यामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व आहे. वर्ष २०१८ पासून हे तत्त्व कार्यरत होण्यास आरंभ होऊन आता वर्ष २०२२ मध्ये ते अधिक कार्यरत झाले आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्यातील वाढत्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांनी उपयोगात आणलेल्या वाहनांवर झाल्याने वाहनांमध्ये चैतन्य निर्माण होऊन त्यातील चैतन्यात अल्प कालावधीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. आपण पुराणांतील कथांमधून ‘देवता पृथ्वीवर अवतार धारण करतात आणि कार्य करतात’, असे ऐकले आहे. सध्याच्या कलियुगातही हे घडत आहे; पण हे जाणून घेण्यासाठी तशी दृष्टी मात्र हवी. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी उपयोगात आणलेल्या वाहनांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण होण्यामागील कार्यकारणभावाला या वैज्ञानिक चाचण्यांतून पुष्टी मिळाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनखाली हे आध्यात्मिक संशोधन करण्याची संधी आम्हा साधकांना मिळाली, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.५.२०२२)

ई-मेल : [email protected]

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक