इंदूर येथे हिंदु असल्याचे सांगून विवाहित मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला विवाहाचे आश्‍वासन देऊन लैंगिक शोषण

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे एका हिंदु तरुणीला अमजद खान नावाच्या मुसलमान तरुणाने तो हिंदु असल्याचे आणि स्वतःचे ‘आदिगौरी’ नाव असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आश्‍वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले. २ वर्षे त्यांचे हे संबंध होते. त्यानंतर या तरुणीला अमजद खान याची खरी माहिती मिळाल्यानंतर तिने केलेल्या तक्रारीनंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमजद खान हा विवाहित असून त्याला ३ मुले आहेत.