परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १२.५.२०२२ या दिवशी विशेष भक्तीसत्संग श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतला. तेव्हा या अलौकिक भक्तीसत्संगाचे भगवंताने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्यावर भक्तीसत्संगातील अडथळे दूर होणे !
भक्तीसत्संगातून पुष्कळ प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण होणार असल्याने ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील वाईट शक्तींनी भक्तीसत्संगात अडथळे आणण्याचे आधीच नियोजन करून ठेवले होते. त्यामुळे भक्तीसत्संगाच्या आरंभी वातावरणात पुष्कळ प्रमाणात दाब जाणवत होता. त्याचप्रमाणे भक्तीसत्संग चालू झाल्यानंतर त्यामध्ये अनेक तांत्रिक अडथळे येऊन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची चैतन्यदायी पश्यंती वाणी श्रोते साधकांपर्यंत पोचत नव्हती. तेव्हा सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळकाका यांनी सूक्ष्मातून नामजपादी उपाय केल्यावर भक्तीसत्संगातील स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरील अडथळे दूर झाले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यात श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होऊन श्रीविष्णूप्रतीचा भाव जागृत होणे !
या सत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या गुलाबी रंगाच्या दिव्य कमळावर विराजमान असल्याचे सूक्ष्म दृश्य दिसले. तेव्हा हे कमळ लक्ष्मीलोकातील सरोवरात असून या सरोवरात राजहंस मुक्तपणे विहार करत होते आणि सरोवरातील जलामध्ये पांढऱ्या रंगाचे हत्ती डुंबत होते. हे दिव्य दृश्य पाहून माझे मन आनंदून गेले आणि मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी गुलाबी रंगाची रेशमी साडी आणि सुवर्णालंकार धारण केलेल्या श्रीमहालक्ष्मीदेवीचे दिव्य दर्शन झाले. त्यांना पाहून माझा श्रीविष्णूप्रतीचा भाव जागृत झाला.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ठिकाणी श्री सरस्वतीदेवीचे दर्शन होणे !
भक्तीसत्संगाच्या वेळी मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचेही अस्तित्व श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शेजारी सूक्ष्मातून असल्याचे जाणवले. तेव्हा मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ठिकाणी श्री सरस्वतीदेवीचे दर्शन झाले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले. श्री सरस्वतीदेवीस्वरूप असणाऱ्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून श्री महालक्ष्मीस्वरूप असणाऱ्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे ज्ञानशक्तीचा ओघ येत होता. या ओघामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य आणि अवतारी कार्याचे वर्णन सुंदर शब्दांत करत होत्या. त्यांची चैतन्यदायी वाणी भावस्पर्शी असल्यामुळे हा दिव्य भक्तीसत्संग ऐकणाऱ्या श्रोत्या साधकांच्या हृदयात श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा अनन्य भाव जागृत होऊन त्यांच्या हृदयमंदिरात भावपुष्प उमलले.
त्यामुळे हा भक्तीसत्संग ऐकून समस्त विश्वातील साधकांची भावजागृती होण्यास प्रारंभ झाला.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्माचे वर्णन केल्यावर वातावरणात दिव्यता जाणवणे !
जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्माचा प्रसंग सांगितला, तेव्हा विष्णुलोकातून पृथ्वीकडे चैतन्याचा स्रोत येतांना दिसला. तेव्हा रामजन्माच्या वेळी जसा आकाशातील सूर्य काही क्षण थांबला होता, तसाच तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्माच्या वेळीही थांबलेला आहे’, अशी अनुभूती आली. तेव्हा वातावरणातील चैतन्याचे प्रमाण वाढून संपूर्ण वातावरण चैतन्यदायी आणि शांत झाले होते.
५. श्रोत्या साधकांच्या मनावर परात्पर गुरुदेवांचे दिव्यत्व आणि अवतारत्व भावमय सुवर्ण अक्षरांत कोरले जाणे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सुंदर रितीने परात्पर गुरुदेवांच्या अवतारी गुणवैशिष्ट्यांचे वर्णन केले. त्यामुळे श्रोत्या साधकांच्या मनावर परात्पर गुरुदेवांचे दिव्यत्व आणि अवतारत्व भावमय सुवर्ण अक्षरांत कोरले गेले अन् त्यांची परात्पर गुरुदेवांप्रती असणारी श्रद्धा दृढ झाली. त्यामुळे साधकांवर गुरुतत्त्वाची कृपा होऊन त्यांची आंतरिक साधना अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागली.
६. भक्तीसत्संगाद्वारे श्रीविष्णूची मारक शक्ती आणि चैतन्य वायूमंडलात प्रक्षेपित होऊन शुद्धी होणे !
या भक्तीसत्संगामध्ये परात्पर गुरुदेवांचा ‘श्री महाविष्णूचे अवतार’ असा उल्लेख केल्यावर त्यातून श्रीविष्णूच्या ज्ञानावताराची मारक शक्ती आणि चैतन्य संपूर्ण वायूमंडलात प्रक्षेपित झाले. त्यामुळे वायूमंडलातील रज-तम प्रधान वाईट शक्तीचे विघटन होऊन वातावरण सात्त्विक आणि चैतन्यदायी झाले. त्याचप्रमाणे साधकांच्या सूक्ष्म देहांवर आलेले त्रासदायक आवरण दूर होऊन साधकांना व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर धर्माचरण अन् साधना करण्यासाठी पुष्कळ बळ मिळाले.
७. भक्तीसत्संग ऐकण्यासाठी उच्च लोकांतील ऋषिमुनी आणि देवता वायूमंडलात आल्याने वातावरण दैवी होणे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय आणि भक्तीमय वाणीतील भक्तीसत्संग ऐकण्यासाठी महर्लाेक, जनलोक, तपलोक अन् सत्यलोक येथील ऋषीमुनी, दिव्यात्मे, पुण्यात्मे, तसेच विविध देवता सूक्ष्मातून रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या वायूमंडलात आल्याचे जाणवले. त्यांनी अत्यंत उत्सुकतेने संपूर्ण भक्तीसत्संगाचे श्रवण केले. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरील वातावरण दिव्य झाले होते. भक्तीसत्संगानंतरही पुढील काही मास पृथ्वीवरील वातावरणाची दिव्यता टिकून रहाणार आहे आणि याचा लाभ पृथ्वीवरील साधकांना होऊन त्यांची साधना अधिक चांगली होणार आहे.
कृतज्ञता
श्रीगुरुमाऊलीच्या कृपेमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य कार्याचे सुरेख विवेचन भक्तीसत्संगाच्या माध्यमातून झाले आणि त्यांची दिव्यता अनुभवण्यास मिळाली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२२)
|