नाशिक येथे ४ कुत्र्यांच्या चाव्यामुळे मुलगा गंभीर घायाळ !

नाशिक – जिल्ह्यातील सिन्नरमध्ये शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ४ कुत्र्यांनी घेरत अनेक ठिकाणी चावा घेतला. यामुळे तो गंभीर घायाळ झाला आहे. त्याच केले आहे. १२ मे या दिवशी हा प्रकार घडला आहे. त्यानंतर या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून आता त्याची प्रकृती बरी आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याने कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, असा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी महापालिकेवर केला आहे.

संपादकीय भूमिका

भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार ?