‘जमात-ए-इस्लामी’ने आतंकवादी याकूब मेमनला ठरवले ‘हुतात्मा’ !

कोच्चि (केरळ) – केरळमध्ये वितरित करण्यात येणारे ‘जमात-ए-इस्लामी’ या मुसलमान संघटनेच्या दिनदर्शिकेत वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमन याला वर्ष २०१५ मध्ये दिलेल्या मृत्यूदंडाच्या दिनांकाचा उल्लेख करून तो ‘हुतात्मा’ असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासह या दिनदर्शिकेत भारताचा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन यांचा उल्लेखच नसल्याचे दिसून आले आहे. तथापि जिन्ना यांच्या मृत्यूचा दिनांक मात्र छापला आहे. यातून या संघटनेची निष्ठा कुणाशी आहे, याचे वेगळे पुरावे देण्याची आवश्यकता नाही, असे ट्वीट येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रथीश विश्‍वनाथ यांनी केली.

संपादकीय भूमिका

  • केंद्र सरकारने अशा संघटनांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !