ताजमहाल शिवालय असल्याचा शासकीय पुरावा !

ताजमहालचे खरे स्वरूप उघड करणारी लेखमाला !

नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत. १३ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ताजमहाल हे शिवालय असल्याचे आधुनिक वैज्ञानिक प्रयोगाद्वारेही सिद्ध याविषयी वाचले. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

ताजमहालपासून ४ कि.मी. अंतरावर आगरा शहरातील बटेश्वर नावाची वस्ती होती. वर्ष १९०० मध्ये ‘पुरातन सर्वेक्षण विभागा’चे संचालक जनरल कनिंघम यांनी केलेल्या उत्खननात तेथे संस्कृतमधील ३४ कडवे असलेले ‘मुंज बटेश्वर आदेश’ नावाचे बाड सापडले. ते लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील संग्रहालयात संरक्षित आहे. त्यातील कडवे क्रमांक २५, २६ आणि ३६ महत्त्वाचे आहेत. त्याचे स्वैर भाषांतर पुढे दिले आहे.

‘‘राजांनी एक संगमरवरी मंदिर बांधले. ते भगवान विष्णूचे आहे. राजांनी दुसरे शिवाचे संगमरवरी मंदिर बांधले. ही बखर विक्रम संवत् १२१२ मास आश्विन शुक्ल पंचमी, शुक्रवार या दिवशी लिहिण्यात आली.’’

(क्रमश:)

(संदर्भ : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, २८ नोव्हेंबर २००४)