नागपूर – शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात एका २८ वर्षीय विवाहित महिलेने तिच्यावर तिच्या मित्राने अत्याचार केल्याची तक्रार ११ मे या दिवशी प्रविष्ट केली आहे. नोकरीचे आमीष दाखवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी रजत राणा याला अटक केली आहे.
पीडित महिला पतीसमवेत पटत नसल्याने माहेरी रहाण्यास आली होती. तिची रजत राणा याच्याशी फेसबूकवर ओळख झाली. त्याने तिला नोकरीचे आमीष दाखवून तिच्याशी ओळख वाढवली. तिने तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी त्याला सांगितल्यावर त्याने तिला धीर देत तिच्याशी जवळीक साधली आणि त्यानंतर अत्याचार केला.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा नोंद !
नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये २७ वर्षीय अमितेश श्रीवास या तरुणाने १५ वर्षीय मुलीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर सलग २ वर्षे अत्याचार केला आहे, अशी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पीडित मुलीला टाळत होता. याविषयी विचारल्यावर त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामहिलांनो, फेसबूकवर कुणाशी मैत्री करायची, ते वेळीच ओळखून सावध रहा ! |