१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम (भाऊ) नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ही आनंदवार्ता कळल्यावर मला पुढील काव्यपंक्ती स्फुरल्या.
भोळाभाबडा जीव ।
साक्षात् विठ्ठल लावी जीव ।। १ ।।
ठेंगणी भाबडी मूर्ती ।
आत भरली ओतप्रोत प्रीती ।। २ ।।
जिवा-शिवाचे (टीप १) मीलन झाले ।
संत सोहळा अनुभवणे झाले ।। ३ ।।
ज्ञान-भक्ती-कर्माचा अपूर्व मेळा ।
आपल्या ठायी आम्हांस विठ्ठल दाविला ।। ४ ।।
आपली सहज भावभक्तीची स्थिती ।
आम्हा सद्गुरुकृपे (टीप २) थोडी-बहुत आकलली ।। ५ ।।
देव (टीप ३) करितसे क्षणोक्षणी लीला ।
यातून पुष्कळ आनंद देत असे या जिवाला ।। ६ ।।
लेखणी थांबण्याचे नाव न घेई ।
जागृत होऊन विवेकबुद्धी त्यासी आवर घाली ।। ७ ।।
लोटांगण घालून आपुल्या चरणांवरी ।
लेखणीला विराम देतसे गुरुचरणांवरी ।। ८ ।।
टीप १ – पू. राजाराम नरुटे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे
टीप २ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या कृपेने
टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्री. संजय गोपाळ घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (१७.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |