सातारा, ११ मे (वार्ता.) – ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने या वर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ७ दिवसांचे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदींचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा लाभ कराड आणि पंचक्रोशीतील २०० हून अधिक महिलांनी घेतला.
प्रतिवर्षी कराड ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने वैशाख शुक्ल द्वितीयेला पारंपरिक शिवजयंती साजरी करण्यात येते. याला ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उदात्त हेतूने लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदींचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ‘हिंदु एकता आंदोलन’चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, प्रांताध्यक्ष विनायक पावसकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष रूपेश मुळे, कार्याध्यक्ष राहुल यादव आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.