हिंदु समाज धर्मग्लानीच्या काळापूर्वीच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा का घेत नाही ? प्रभु श्रीरामाने ऋषिमुनींचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण करून आपल्या धर्माचे पालन केले नाही का ? महाज्ञानी रावणाचा वध करून श्रीरामाने दिलेला प्रेरणादायी संदेश विसरून आपण विरोध करणाऱ्यांवर कोणताही प्रहार करणार नाही का ? अशाच प्रकारे भगवान श्रीकृष्णाने धर्मरक्षणार्थ महाभारताचे युद्ध घडवले होते, हे समजून न घेता केव्हापर्यंत स्वतःला अज्ञानात ठेवून कातडी वाचवत रहाणार ? अज्ञानाच्या स्थितीमध्ये किती काळ शत्रूंच्या षड्यंत्रांना बळी पडत रहाणार ? जे कधी आचरणात आणले जाणार नाही, अशा श्रद्धांचे मूल्य कधी टिकून राहील का ? – श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)