ईश्वराकडे गार्हाणे (तक्रार) गाण्याऐवजी मी माझ्याच लेकरांना साद घालते आहे. हे माझ्या कोट्यवधी लेकरांनो, माझ्या आयुष्यात आता पुन्हा एकदा मोठे वादळ उठले आहे. या वादळातून माझी सुटका करण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्यात (भारतात) हिंदु राष्ट्र आणून बजावून मला वाचवा, अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करत आहे.
परकीय आक्रमकांनी माझे तुकडे केले. मला लुटले. माझे रक्षण करण्यासाठी माझ्या अनंत पुत्रांनी प्राणांची बाजी लावली. मला परकियांच्या दास्यातून मुक्त केले. हे थोर कार्य करतांना अनेकांनी बलीदान दिले, कारावास भोगला, अनंत यातना सहन केल्या. या सर्वांचे बलीदान व्यर्थ होणार नाही, याची काळजी घेऊन माझे रक्षण करण्यासाठी धडपडणारे राष्ट्रनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मनिष्ठ यांच्याकडे मी अत्यंत आशेने पहात आहे. तिला विजयी करा. अशी पुनश्च तुम्हा सर्वांना प्रार्थना करत आहे.
– तुमची भारतमाता (संकलक : श्री. दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली.)