थिरूवनंतपूरम् (केरळ) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (‘पी.एफ्.आय.’च्या) कार्यकर्त्यांनी हत्या करण्यासाठी बनवलेल्या एका सूचीमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित १०० जणांची नावे असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. काही दिवसांपूर्वी राज्यात संघाचे कार्यकर्ते श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी चौकशी करतांना ही माहिती समोर आली आहे. या हत्येच्या प्रकरणी पी.एफ्.आय.च्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
PFI terrorists prepared a list of 100 RSS leaders before targeting Sreenivasan for murder https://t.co/sHDEnDkb86
— HinduPost (@hindupost) April 29, 2022
या सूचीमध्ये भाजपचे केरळ राज्य सरचिटणीस सी. कृष्णकुमार, भाजपचे युवा नेता प्रशांत सिवान आदींचा समावेश आहे. या नेत्यांच्या हत्येमागे पी.एफ्.आय.चा सदस्य जुबेर याच्या हत्येचा सूड उगवण्याचा उद्देश होता. श्रीनिवासन् यांची हत्या याच सूचीनुसार करण्यात आली. ही या सूचीतील पहिली हत्या होती, असे आरोपींनी सांगितले.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकार आतातरी या संघटनेवर बंदी घालणार आहे का ? |