होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर मूळचे अमरावती येथील आहेत. १५ ते १८.४.२०२२ या कालावधीत त्यांचे रामनाथी (गोवा) येथे रुग्णतपासणीचे शिबिर आहे. साधक वैद्यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. ‘होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर सगळ्यांशी नम्रतेने बोलतात.
२. ते शिबिरासाठी वेळेत उपस्थित असतात.
३. त्यांची निरीक्षणक्षमता चांगली आहे. तिचा त्यांना चिकित्सा करतांनाही लाभ होतो.
४. साधना : ते गायत्री मंत्राची साधना करतात. ते प्रतिदिन पहाटे ३ वाजता उठून साधना करतात. त्यात ते कधीही सवलत घेत नाहीत.
५. ते आम्ही सांगितलेले नियोजन सहजतेने स्वीकारत होते.
६. अनेक विषयांचा अभ्यास असूनही अहं अल्प असणे : ते होमिओपॅथी वैद्य असूनही त्यांनी विधी आणि व्यवस्थापन क्षेत्रात पदवीपर्यंतचे (एल्.एल्.बी. आणि एम्.बी.ए.) शिक्षण घेतले आहे. त्यांचा ‘भूगर्भातील पाणी शोधणे, रेकी आणि ज्योतिषशास्त्र’, या विषयांचाही अभ्यास आहे; मात्र त्यांना याविषयी अहं नाही. ते आम्हाला सहजतेने त्यांना ज्ञात असलेली सूत्रे सांगत होते.
७. त्यांना अनुभवातून मिळालेले ज्ञान आम्हाला देण्याची पुष्कळ तळमळ आहे. त्यांना लोककल्याणार्थ काम करण्याची तीव्र इच्छा आहे.
८. रुग्णतपासणी करतांना जाणवलेली वैशिष्ट्ये
८ अ. ते आयुर्वेदानुसार नाडी परीक्षण करून रोगाचे निदान करतात. त्यानुसार ते रुग्णांना होमिओपॅथीची औषधे देतात. ते नाडी परीक्षण करण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात.
८ आ. ‘त्यांच्या चिकित्सापद्धतीमध्ये त्यांना एखादी दैवी शक्ती साहाय्य करते’, असे आम्हाला वाटते.
९. भाव
अ. ‘ते रुग्णतपासणीच्या वेळी अनुसंधानात असतात’, असे आम्हाला वाटते.
आ. त्यांच्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आहे. त्यांनी स्वतःच्या रुग्णालयात ते जेथे रुग्ण तपासतात, तेथे मागच्या बाजूला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र लावले आहे आणि समोर श्रीकृष्णाचे चित्र लावले आहे.
इ. त्यांच्यात दत्तगुरु आणि गायत्रीदेवी यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.’
– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर, होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, वैद्या (कु.) अपर्णा महांगडे, वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर आणि वैद्या (सौ.) स्वराली स्वप्नील नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२२)