रशियाच्या आक्रमणाच्या ५० दिवसांनंतरही आपण टिकून आहोत ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

कीव (युक्रेन) – रशियाने आपल्याला केवळ ५ दिवस दिलेले असतांनाही आपण ५० दिवसांनंतरही टिकून आहोत. यासाठी तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, असे विधान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी देशवासियांना उद्देशून केले आहे.

युक्रेनने रशियाची युद्धनौका ‘मॉस्क्वा’ हिला काळ्या समुद्रात बुडवले. त्यावरून झेलेंस्की म्हणाले की, रशियाच्या युद्धनौका समुद्राच्या तळाशी असल्या, तरी त्यांना आपण माघारी पाठवू शकतो हेसुद्धा दाखवून दिले. अनेक देशांच्या नेत्यांना युक्रेन युद्धात टिकेल कि नाही, याविषयी निश्‍चिती नव्हती. अनेकांनी मला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता; पण त्यांना युक्रेनी लोक किती शूर आहेत, हे ठाऊक नाही.