खरगोन (मध्यप्रदेश) येथे मंदिर आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस उपस्थित असल्याचे उघड !

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमणाचे प्रकरण

हिंदूंची मिरवणूक काढली जात असतांना पोलिसांनी त्याला संरक्षण का दिले नाही, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे ! तसेच या निष्काळजीपणाला उत्तरदायी असणार्‍यांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे ! – संपादक

खरगोन (मध्यप्रदेश) – येथे श्रीरामनवमीच्या दिवशी मुसलमानबहुल भागातून मिरवणूक जात असतांना त्यावर आक्रमण करण्यात आले होते. याचे विविध ‘सीसीटीव्हीज’चे चित्रीकरण आता समोर आले आहे. यात धर्मांधांनी शहरात कसा गोंधळ घातला, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. येथे पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नव्हता, हेही दिसून आले आहे. पोलीस वेळेवर पोचले असते, तर धर्मांधांवर नियंत्रण मिळवता आले असते.

गोशाळा मार्गावरील शीतलामाता मंदिराजवळ धर्मांधांचा जमाव होता. तेव्हा मंदिराच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस काठी घेऊन उभा होता, असे या व्हिडिओजमध्ये दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असतांनासुद्धा तेथील पोलीस अधिकार्‍यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली नाही. धर्मांधांनी शीतलामाता मंदिर आणि त्याच्या जवळच्या हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे चालूच ठेवले; पण तरी पोलीस अधिकारी काही करू शकले नाहीत.