आज चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…
‘एकदा पू. भार्गवराम ‘रामायण’ ही मालिका पहात होते. त्यात पुढील प्रसंग होता, ‘रावणावर विजय मिळवल्यावर श्रीराम अयोध्येला परत आला. त्यानंतर श्रीरामाचा राज्याभिषेक झाला. त्या वेळी हनुमानाने श्रीरामाला केलेल्या साहाय्यावर प्रसन्न होऊन सीतामातेने हनुमानाला तिच्या गळ्यातील अमूल्य मोत्यांचा हार भेट म्हणून दिला. हनुमानाने त्या हारातील एकेक मोती फोडून ‘त्यात श्रीराम आणि सीतामाता आहे का ?’, हे पाहिले आणि ‘त्यात श्रीराम अन् सीतामाता नाही’, असे लक्षात आल्यावर त्याने तो मोत्यांचा हार फेकून दिला. तेव्हा बिभीषणाने मारुतीला त्याविषयी विचारले. त्या वेळी दुःखी झालेल्या मारुतीने स्वतःची छाती फाडून त्याच्या हृदयात असलेले ‘प्रभु श्रीराम आणि जानकीमाता’ दाखवले.’ हा प्रसंग पहातांना पू. भार्गवराम यांची पुष्कळ भावजागृती होत होती. हा प्रसंग ते अनेक वेळा पहात होते.’
– श्रीमती अश्विनी प्रभु (आजी (वडिलांची आई), ६१ टक्के आध्यात्मिक पातळी), मंगळुरू, कर्नाटक (१.१२.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |