बांगलादेशात टिकली लावणार्‍या प्राध्यापिकेला पोलीस अधिकार्‍याकडून ठार मारण्याची धमकी !

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबबंदी असतांना कोणत्याही पोलीस अधिकार्‍याने कोणत्याही मुसलमान विद्यार्थिनीला कधी अशी धमकी दिली नाही; मात्र बांगलादेशात टिकली लावण्यावर कोणतीही बंदी नसतांना अशा प्रकारची धमकी दिली जाते, याविषयी भारतातील निधर्मीवादी बोलतील का ? – संपादक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील तेजगाव येथील खासगी महाविद्यालयामध्ये प्राध्यापिकेने टिकली लावल्याने एका पोलीस अधिकार्‍याने तिला ठार मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. ‘ढाका ट्रिब्युन’ वृत्तपत्राने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या महाविद्यालयातील प्राध्यापिका लोटा सुमद्देर यांनी सांगितले, ‘२ एप्रिल या दिवशी दुचाकीवरून जाणार्‍या एका पोलीस अधिकार्‍याने मला टिकली लावण्यावरून आक्षेपार्ह टिपणी केली आणि त्रास दिला. मी पोलीस अधिकार्‍याच्या या कृत्याचा विरोध केल्यावर त्याने मला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने दुचाकीद्वारे धडक दिल्यामुळे मी खाली पडून घायाळ झाले.’