६.३.२०२२ या दिवशी देवद आश्रमातील साधिका सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (आताच्या सनातन संस्थेच्या संत पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी) या संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यावर साधिकेने अनुभवलेली भावस्थिती ..!
चैतन्याचा ओघ पसरला ।
सर्वत्र आनंदीआनंद झाला ।। १ ।।
आमच्या सर्वांच्या प्रिय रत्नमालाताई ।
आज विराजमान झाल्या संतपदी ।। २ ।।
वागण्यात असे तिच्या सहजावस्था ।
अन् हास्यात असे कोमलता ।। ३ ।।
न्याहाळता तिची व्यापकता ।
आपुल्याहूनी आपली वाटे (टीप १) ।। ४ ।।
अशी सर्व गुणांनी युक्त ।
असे आमची पू. रत्नमालाताई ।। ५ ।।
टीप १ – ‘ती आणि मी एकच आहे’, इतकी ती आपलीशी वाटते.
– कु. मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०२२)
या कवितेत करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |