उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करू ! – मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी  

भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायद्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन करू. ही समिती आम्हाला कायद्याचे प्रारूप बनवून देईल आणि नंतर हा कायदा आम्ही राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केले. भाजपने राज्यात समान नागरी कायदा बनवण्याचे आश्‍वासन निवडणुकीत दिले होते. या निवडणुकीत धामी यांचा पराभव झाला.

मुख्यमंत्री धामी पुढे म्हणाले की, उच्चस्तरीय समितीमध्ये कायदेतज्ञ, निवृत्त अधिकारी आणि विचारवंत यांचा समावेश करण्यात येणार आहे. समान नागरी कायदा झाल्यानंतर कुणावरही अन्याय होणार नाही. सर्वांना समानतेचा अधिकार मिळेल.