१. शिकण्याची वृत्ती
पूर्वी सत्संगात संत किंवा उन्नत साधक बोलत असतील, तर सौ. कोंडावारकाकू मध्येच बोलायच्या; परंतु आता त्या मधे न बोलता इतरांचे बोलणे पूर्णपणे ऐकतात. आता त्यांच्यातील शिकण्याची वृत्ती वाढली आहे.
२. साधनेची तळमळ
त्या भावपूर्ण नामजप करतात. त्यांच्याकडून आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेवा होत नाही; परंतु त्यांच्यामध्ये सेवा करण्याची तळमळ वाढली आहे. त्यांचा तन, मन आणि धन यांचा त्याग वाढला आहे.’
– वणी, जिल्हा यवतमाळ येथील सर्व साधक आणि सौ. सरिता कोंडावार (सौ. अपर्णा कोंडावार यांची सून)
३. प्रेमभाव
अ. ‘आमची नात स्वभावाने अतिशय हट्टी आहे. त्यामुळे आम्ही सर्व जण तिच्यावर रागावतो; परंतु सौ. अपर्णा तिच्याशी प्रेमाने बोलून तिला शांत करते. ती आमच्याशी आणि इतरांशीही प्रेमाने बोलते. तसेच शेजारील गरीब स्त्रियांना आमच्या नळाद्वारे पाणी भरण्यास सांगते.
आ. समाजातील महाविद्यालयीन मुलींच्या हातात बांगड्या आणि कपाळाला कुंकू नसते. हे बघितल्यावर सौ. अपर्णा त्यांना धर्माचरणाचे महत्त्व प्रेमाने समजावून सांगते.’
– श्री. उमाकांत काेंडावार (सौ. अपर्णा यांचे पती), वणी, जिल्हा यवतमाळ
इ. ‘मी गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी सौ. कोंडावारकाकूंकडे गेले होते. तेव्हा त्या नातवंडांकडून प्रार्थना आणि अत्तर, कापूर इत्यादींद्वारे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करवून घेत होत्या. त्या सून आणि नातवंडे यांच्याशी बोलतांनाही त्यांच्यात प्रेमभाव जाणवतो.
४. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असे अनुभवणे
पूर्वी काकूंना परात्पर गुरु डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटावेसे वाटत असे; परंतु आता ‘मला परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून दर्शन होऊन आनंद मिळतो’, असे त्या म्हणतात. यावरून ‘आता त्यांना ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, असे वाटायला लागले आहे’, असे वाटते.’
– सौ. सुनंदा हरणे, यवतमाळ
५. सूक्ष्मातील कळणे
‘आमचा बोलतांना विषय वेगळा असतो; परंतु ‘ती माझ्या मनातील विषय जाणून त्याच विषयावर बोलते’, असे मला अनेकदा अनुभवायला मिळाले आहे.’ – श्री. उमाकांत काेंडावार
६. अनुभूती
‘मी सौ. अपर्णा कोंडावार यांच्याविषयी वरील सूत्रे टंकलिखित करतांना मला तटस्थपणा, स्थिरता आणि निर्विचार अवस्था भरपूर वेळ अनुभवायला मिळाली.’ – श्री. लहू खामणकर, यवतमाळ
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २४.९.२०१८)
(लेख श्री. उमाकांत काेंडावार यांच्या निधनापूर्वीचा असल्याने लेखात पूर्वीप्रमाणे नावांचा उल्लेख ठेवला आहे. – संपादक)
|