प्रत्येक कृतीत अन् प्रत्येक क्षणी श्री गुरूंना आठवावे ।

‘गेल्या काही दिवसांपासून दिवसाचा आरंभ झाल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना प्रत्येक कृती कशी करायची ?’, हे शिकवल्याचे आठवून मला त्यांच्या अनुसंधानात रहाता येते. त्यासाठी त्यांनीच सुचवलेले हे काव्य त्यांच्या सुकोमल चरणी अनन्यभावे अर्पण करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले
सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे

दिवसाचा आरंभ व्हावा श्री गुरूंच्या स्मरणाने ।
प्रत्येक कृती करावी त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ।। १ ।।

या माध्यमातून प्रत्येक क्षणी त्यांना आठवावे ।
आपल्या हृदयमंदिरात त्यांना साठवावे ।। २ ।।

त्यांनी शिकवली दिनचर्येतील प्रत्येकच कृती ।
ज्या माध्यमातून प्रत्येक वेळी त्यांची आठवण व्हावी ।। ३ ।।

कृपा ही त्यांची आता उलगडली ।
त्यातही त्यांची प्रीती अनुभवली ।। ४ ।।

श्रीकृष्णाची लीला ही न्यारी ।
मात्र ‘ते’ म्हणती ‘तो’ ‘मी’ नाही ।। ५ ।।

मी तर तुमच्याप्रमाणेच सामान्य जीव ।
हाच तर आहे त्यांच्यातील शिष्यभाव ।। ६ ।।

त्यांचे हे गुण आत्मसात करण्यास पडतो आम्ही अपुरे ।
त्यांच्या प्रत्येकच कृतीकडे असावे लक्ष आपुले ।। ७ ।।

त्यांची प्रत्येकच कृती असते आदर्श ।
जिला सदैव असतो भक्तीभावाचा स्पर्श ।। ८ ।।

त्यांना न्याहाळण्याचा घेऊया आनंद ।
तेही आपल्याला पाहून करत आहेत हास्य मंद ।। ९ ।।

आपले आयुष्य आहे, केवळ त्यांच्या कृपेने ।
कर जोडूनी करूया, त्यांचे स्मरण कृतज्ञतेने ।। १० ।।

त्यांना अपेक्षित आहे, ‘आपण रहावे सतत भावावस्थेत’ ।
त्यांचा संकल्पच आहे हा आपल्यासाठी ।। ११ ।।

ते म्हणतात, नकारात्मकतेत नको रहायला ।
माझ्या प्रिय साधकांनो, नका एक क्षणही घालवू वाया ।। १२ ।।

नरजन्म हा मिळतो परम भाग्याने ।
करा त्याचे सार्थक जगूनी ईश्वरेच्छेने ।। १३ ।।

फेडू शकत नाही, त्यांचे ऋण आपण काही केल्या ।
स्वतः राहूनी आनंदी इतरांनाही आनंद देऊया ।। १४ ।।

चराचरात त्यांचे अस्तित्व अनुभवूया ।
आणि अखंड कृतज्ञताभावात राहूया ।। १५ ।।

याने जाणवेल आपल्याला ओघ गुरुकृपेचा ।
भरभरून देत आहेत, ते सर्व साधकांना ।। १६ ।।

या प्रेमाच्या वर्षावाने माझे हृदय चिंब भिजले । जे तू प्रेम मज दिधले ।। १७ ।।

(हे काव्य सुचत असतांना प.पू. रामानंद महाराज यांच्या वाणीतील ‘जे कधी कुणी ना केले, ते तू प्रेम मज दिधले’ हे भजन कानी पडल्यावर वाटले, ‘या कवितेच्या अखेरीस या ओळी अगदी योग्य आहेत.’)

– कु. युवराज्ञी शिंदे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक