१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाण्यात हाताचे एकेक बोट बुडवल्यावर पाण्याचा रंग प्रथम गुलाबी आणि त्यानंतर लालसर गुलाबी होणे
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एक प्रयोग घेतला. एका ‘प्लास्टिक’च्या भांड्यातील पाण्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी हाताचे एक बोट बुडवले. तेव्हा पाणी थोडे गुलाबी रंगाचे झाल्याचे मला जाणवले. त्यानंतर दुसरे, तिसरे आणि चौथे अशी चार बोटे बुडवल्यावर भांड्यातील पाण्याचा रंग गडद होत गेला आणि शेवटी पाण्याचा रंग लालसर गुलाबी झाल्याचे माझ्या लक्षात आले. या प्रयोगाचे विवरण करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती हे एकत्र असतात’, या नियमाप्रमाणे पाण्याला हाताच्या बोटांचा स्पर्श झाल्याने त्यांतून बाहेर पडणार्या तेजतत्त्वाची शक्ती पाण्यात प्रक्षेपित होऊन पाण्याचा रंग क्रमाने फिकट गुलाबी, अधिक गुलाबी आणि लालसर गुलाबी झाला.’’
२. प्रयोग चालू असतांना आणि झाल्यावर जाणवलेली सूत्रे
या प्रयोगाच्या वेळी मला पुष्कळ शक्ती जाणवली. माझ्याकडे ‘शक्तीचा झोत प्रक्षेपित होत आहे’, असे वाटून मला पुष्कळ उष्णता जाणवू लागली. प्रयोग झाल्यानंतर माझ्या शरिरावर रोमांच आले.
– श्री. सुधाकर नारायण पाध्ये (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |