बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांना न्याय मिळावा यासाठी बजरंग दल-विहिंप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे आंदोलन, निवेदन

हर्षच्या हत्येच्या विरोधात सर्वत्र आक्रोश !

निपाणी शहरात बजरंग दल-विहिंप, हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा

कोल्हापूर, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची जिहादी विचारसरणीच्या लोकांनी हत्या केली. तरी या गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळावी आणि हर्ष यांना न्याय मिळावा यासाठी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र अन् कर्नाटक येथे २५ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन, निवेदन देण्यात आले.

१. निपाणी शहरात बजरंग दल-विहिंप, हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांच्या वतीने  मोर्चा काढण्यात आला.

निपाणी शहरात काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी हातात धरलेले फलक

२. बेळगाव येथे हमारा देश संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सचिन इनामदार, विजयकुमार टी., सतिश उंडाळे, महेश बेटगेरी, नरेंद्र अनवेकर, अरुण मोहिते, सम्राट गोडसे, नितीन अणवेकर, मल्लीकर्जुन कोटगी, प्रशांत राणे, शशिकांत घाटगे, कॅप्टन क्रिष्णा शहापूरकर, शुभांगी झेंडे, नीना काकतकर,  व्यंकटेश शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.
३. जत येथे बजरंग दल-विहिंप यांच्या वतीने मोर्चा काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले.

जत येथे मोर्चाप्रसंगी उपस्थित बजरंग दल-विहिंपचे कार्यकर्ते

४. कोल्हापूर येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वीकारले. या प्रसंगी विहिंप जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर, श्री. अशोक रामचंदानी, इचलकरंजी येथील बजरंग दलाचे श्री. संतोष हत्तीकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सर्वश्री तुकाराम मांडवकर, नितेश कुलकर्णी, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप यांसह अन्य उपस्थित होते.

कोल्हापूर येथे तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देतांना विहिंप, बजरंग दल यांचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ