शस्त्र बाळगणार्‍या पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्याला अटक !

प्रतिकात्मक चित्र

कन्नूर – कर्णावती येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने ३८ जिहादी आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाला विरोध करण्यासाठी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने केरळमधील कन्नूर शहरात मोर्चा काढला होता. त्या वेळी धारदार चाकू बाळगल्याच्या प्रकरणी १९ वर्षीय जिहादी कार्यकर्ता फरहान शेख याला अटक करण्यात आली.

(मुळात न्यायालयाचा निकाल पी.एफ्.आय.वाल्यांना का मान्य नाही ? याचा अर्थ या जिहाद्यांना भारतीय कायदे मानायचे नाहीत, हे लक्षात घ्या. दुसरे म्हणजे मोर्चा काढतांना चाकू बाळगण्याची काय आवश्यकता ? ‘मोर्चाच्या नावाखाली या जिहाद्यांना हिंसाचार घडवायचा होता का ?’, याचीही पोलिसांनी चौकशी करायला हवी !- संपादक ) निदर्शने झाल्यानंतरही पी.एफ्.आय.चे जिहादी कार्यकर्ते घटनास्थळावरून जाण्यास सिद्ध नव्हते. पोलिसांनी त्यांना जागा खाली करण्यास सांगितल्यावर जिहाद्यांनी गोंधळ घालण्यास आरंभ केला. त्या वेळी पोलिसांनी शेख याला अटक केली.