युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांनी तात्काळ देश सोडावा ! – भारतीय दूतावासाचा सल्ला

नवी देहली – युक्रेनची राजधानी किव येथील भारतीय दूतावासाने तेथील भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यासाठी  विमानांची सोय करण्यात आल्याची माहितीही दूतावासाकडून देण्यात आली आहे. यासाठी भारत सरकारने ‘युक्रेन आणि भारत यांच्यातील विमान वाहतूक चालू करण्यात येईल’, असे सांगितले आहे. युक्रेनमध्ये जवळपास १८ सहस्र भारतीय विद्यार्थी आहेत. यांतील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.