भ्रष्टाचाराला विरोध करण्याच्या आंदोलनातून ज्या पक्षाची स्थापना झाली, त्याच पक्षाची नगरसेविका लाच घेते, यावरून ‘सर्वच राजकीय पक्ष आणि राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत’, हे स्पष्ट होते !
नवी देहली – येथील आम आदमी पक्षाच्या नगरसेविका गीता रावत यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) पटपडगंज येथील विनोद नगर वॉर्डातून अटक केली. त्यांना लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.
AAP’s lady Councillor arrested in Delhi for accepting bribe of Rs 20,000.
Lady Councillor identified as Geeta Rawat.@AAPDelhi @BJP4Delhi #GeetaRawat @AAPgeeta16JRead full story 👇https://t.co/2pweHHdctT
— The Delhi Crown | Follow Us for latest Delhi News (@DelhiCrown) February 18, 2022
शेंगा विकणार्या व्यक्तीच्या माध्यमातून हे पैसे गीता रावत यांच्याकडे पोचवण्यात आले. सीबीआयने शेंगा विक्रेत्यालाही अटक केली आहे.