|
बेंगळुरू (कर्नाटक) – शिक्षण हा मूलभूत अधिकार असून कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये मुसलमान मुलींची टक्केवारी पूर्वी पुष्कळ अल्प होती; परंतु अलीकडच्या काळात अनेकजण शिक्षणात रस दाखवत आहेत. हिजाबचे (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेल्या वस्त्राचे) सूत्र उपस्थित करून मुसलमान मुलींना शिक्षण नाकारण्याचे कारस्थान संघ परिवार करत आहे, असा फुकाचा आरोप कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे एका पत्रकार परिषदेमध्ये केला. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार उपस्थित होते.
At a press meet, accompanied by Karnataka Congress president DK Shivakumar, Siddaramaiah said that wearing hijab was a personal choice of Muslim women.https://t.co/3OT8awPt83
— Express Bengaluru (@IEBengaluru) February 18, 2022
सिद्धरामय्या पुढे म्हणाले की,
१. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध आणि जैन यांच्या धार्मिक श्रद्धांवर आधारित अनेक प्रथा आहेत. हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यात कुणीही हस्तक्षेप करू नये.
२. मी हिजाबच्या वादामागे असलेल्या सर्व संघटनांचा मग ते संघ असो, सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया असो किंवा बजरंग दल असो, त्यांच्या भूमिकेचा निषेध करतो. सर्व कट्टरतावादी संघटना शांतता आणि सौहार्द यांना धोका आहेत.
३. विद्यार्थ्यांनी गणवेशाला विरोध केलेला नाही. त्यांनी गणवेशासह हिजाब परिधान केला आहे आणि शिक्षणासाठी अनुमती मागत आहेत. विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवणे चुकीचे आहे.