तालिबानकडून सैन्याच्या तुकडीचे नाव ‘पानीपत’ ठेवून भारताला चिथावण्याचा प्रयत्न !

पानीपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, तरी त्यानंतर कोणत्याही मुसलमान आक्रमकाला पुन्हा भारतात आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही, हा इतिहासही तालिबानने लक्षात ठेवावा !

तालिबानने पुन्हा पानिपत नावाची लष्करी तुकडी बनवून भारताला दिली चिथावणी !

नवी देहली – तालिबानने भारताला चिथावण्यासाठी त्याच्या एका सैन्य तुकडीचे नामकरण ‘पानीपत’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. पानीपत हा हरियाणाचा एक जिल्हा आहे. याच ठिकाणी वर्ष १७६१ मध्ये पानीपतची तिसरी लढाई लढली गेली होती.

या लढाईत तत्कालीन अफगाण शासक अहमदशाह अब्दाली याच्याकडून मराठ्यांना पराभव पत्करावा लागला होता. यामुळेच तालिबानने भारताला चिथावण्याचा प्रयत्न केला आहे. ही तुकडी अफगाणिस्तानच्या पूर्व भागात असलेल्या ‘नांगरहार’ प्रांतात तैनात केली जाणार आहे. या प्रांताची सीमा पाकिस्तानला लागून आहे.