‘ह्युंदाई’ आस्थापनाकडून फुटीरतावादी काश्मिरींच्या कथित स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे समर्थन

भारतियांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर ह्यंदाईकडून क्षमायाचनेऐवजी केवळ वरवरचे स्पष्टीकरण

अशा भारतविरोधी आणि पाकप्रेमी आस्थापनावर, तसेच तिच्या उत्पादनांवर भारतियांनी बहिष्कार घातला पाहिजे ! केंद्र सरकारनेही या आस्थापनावर कारवाई केली पाहिजे, म्हणजे अन्य विदेशी आस्थापनांना अशा प्रकारची भारतविरोधी कृत्य करण्याची भीती वाटेल ! – संपादक

नवी देहली – ‘ह्युंदाई’ या दक्षिण कोरियातील चारचाकी वाहन निर्मिती आस्थापनाच्या पाकिस्तानमधील फेसबूक आणि ट्विटर खात्यावरून पाकिस्तानच्या बाजूने काश्मीरविषयी पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार घडला. पाकिस्तानकडून ५ फेब्रुवारी हा ‘काश्मीर दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या आस्थापनाने पोस्टमध्ये ‘चला काश्मिरी बंधूंच्या बलीदानाची आठवण काढूया आणि त्यांचे समर्थन करूया; कारण ते आजही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत’, असा मजकूर प्रसारित केला. या पोस्टमुळे भारतामध्ये ह्यंदाईला विरोध चालू झाला आहे. ‘#BoycottHyundai’ नावाने ‘ट्रेंड’ चालवण्यात आला. ‘ह्युंदाई’ ही वर्ष १९९६ पासून भारतात व्यवसाय करत आहे.

(म्हणे) ‘भारत आमच्यासाठी दुसरे घर ! – ह्युंदाई

भारत हे या आस्थापनाचे दुसरे घर केवळ व्यापारी लाभासाठी आहे. जर खरोखर ह्युंदाईला भारताविषयी प्रेम असते, तर भारतियांचे मन आणि अस्मिता दुखावणारी पोस्ट ह्युंदाईने केलीच नसती ! यासह अशा पोस्टनंतर ह्युंदाईने क्षमायाचनाही केलेली  नाही ! – संपादक

ह्यंदाईकडून प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही भारतीय बाजारपेठेत गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहोत. आम्ही भारताच्या राष्ट्रवादाच्या  सन्मानार्थ भक्कमपणे उभे आहोत. सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणारे काही पोस्ट आमच्या सेवेला दुखावणारी आहे. भारत आमच्यासाठी दुसरे घर आहे. भारताती नागरिकांच्या भल्यासाठी आम्ही भारतासमवेत सर्वोतोपरी प्रयत्न करत राहू.