१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिल्यावर जणू ‘भगवंताला पाहिले’, असे अनुभवणे आणि तेव्हापासून ईश्वराशी अनुसंधान चालू होणे
‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले केवळ माझेच नाही, तर ते जगद्गुरु आहेत. मी कधी भगवंत पाहिला नाही; परंतु मला भगवंताला पहाण्याची इच्छा होती. परात्पर गुरुदेवांना पाहिल्यावर ‘भगवंत कसा असतो ?’, हे मी अनुभवले. त्यानंतर माझे अनुसंधान चालू झाले. परात्पर गुरुदेवांना पाहिल्यावर कुणाचेही अनुसंधान चालू होईल.
२. साधनेत येण्यापूर्वीपासूनच संकटकाळी आणि तणावाच्या प्रसंगातून परात्पर गुरुदेवांनी वेळोवेळी बाहेर काढणे
आपण परात्पर गुरुदेवांना विसरतो; परंतु ते आपल्याला कधीच विसरत नाहीत. आजपर्यंत मी कधी संकटात असल्यास परात्पर गुरुदेवांनी प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मला त्या संकटातून बाहेर काढले आहे. माझ्या आयुष्यात कधी तणावाचे प्रसंग आल्यास त्यातूनही परात्पर गुरुदेवांनी मला वेळोवेळी बाहेर काढले आहे. साधनेत येण्यापूर्वी काही कारणांमुळे मला ताण आल्यास त्यातून बाहेर पडायला मला २ – ३ दिवस लागायचे. त्या वेळीही परात्पर गुरुदेवच मला त्यातून बाहेर काढायचे; परंतु साधनेत आल्यापासून मला ताण आल्यास मी त्यातून केवळ ३० मिनिटांत बाहेर येतो. त्यानंतर गुरुदेव कुणाच्या तरी माध्यमातून मला आलेला ताण दूर करतात.
३. हिंदु राष्ट्र हे जीवनाचे ध्येय असणे
गुरुदेव प्रत्येक क्षणी माझ्या समवेत असतात. आपल्यासारख्या सर्वसाधारण मानवांना गुरूंची अपार लीला कशी समजणार ? हे केवळ भगवंतच करू शकतो. त्याने आपल्याला इतके दिले आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी पुष्कळ करायला पाहिजे. आतापासून गुरुदेवांचा संकल्पच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. माझा प्रत्येक श्वास हिंदु राष्ट्रासाठी आहे आणि माझे ध्येय केवळ हिंदु राष्ट्र आहे.
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये परात्पर गुरुदेव आहेत. त्यांनी मला एवढे दिले आहे की, मी ते शब्दांत वर्णन करू शकत नाही.’
– आपल्या चरणी, श्री. अमित बर्मन, आसाम (२८.८.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |