ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य नझीर अहमद यांना साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण  

धर्मांध कितीही मोठे झाले, तरी त्यांची वासनांध वृत्ती जगजाहीर होतेच ! – संपादक

डावीकडून नझीर अहमद

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’चे (संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे) आजन्म सदस्य असणारे लॉर्ड नझीर अहमद (वय ६४ वर्षे) यांना ७० च्या दशकात एक अल्पवयीन मुलगी आणि मुलगा यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नझीर हे संसदेचे आजन्म सदस्य म्हणून नियुक्त होणारे पहिले मुसलमान आहेत. आता त्यांचे हे सदस्यत्व रहित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. नझीर अहमद यांचा जन्म पाकव्याप्त काश्मीरमधील आहे.