उडुपी (कर्नाटक) येथील आणखी एका महाविद्यालयात हिजाबवर बंदी

उडुपी (कर्नाटक) – येथील आणखी एका महाविद्यालयामध्ये मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी येथील कुंदापूरमधील सरकारी महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालून येण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रतिबंध करण्यात आला होता. यानंतर हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून महाविद्यालयात प्रवेश केला होता.

गेल्या २० दिवसांपासून मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून येऊ लागल्या आहेत ! – शिक्षणमंत्री बी.सी. नागेश

जर असे आहे, तर यामागे कोणते षड्यंत्र आहे, याचा शोध सरकारने घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक 

शिक्षणमंत्री बी.सी. नागेश

याविषयी राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश म्हणाले की, पूर्वी या मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून येत नव्हत्या; मात्र गेल्या २० दिवसांपासून त्यांनी हिजाब घालून येण्यास प्रारंभ केला आहे. याविषयी आम्ही एक समिती बनवणार आहोत. ही समिती पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत अंतिम अहवाल सादर करील आणि त्यानंतर आम्ही याविषयी निर्णय घेऊ.

शिक्षणाला धर्मापासून दूर ठेवले पाहिजे ! – गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र

गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र

कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र म्हणाले की, कोणत्याही शिक्षणसंस्थेत शिक्षणाला धर्मापासून दूर ठेवले पाहिजे. येथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी हिजाब किंवा भगवे उपरणे घालून येऊ नये. त्यांनी त्यांच्या धर्माचे पालन करण्यासाठी शाळेत येऊ नये. शाळा हे ज्ञानमंदिर असून येथे शिक्षण घेण्याच्याच उद्देशाने आले पाहिजे.